राजकीय
ब्रेकींग! उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही, असे विधान करत त्यांच्याविषयी असलेली मनातील भावना व्यक्त केली. निवडणुकीच्या प्रचारात उद्धव आणि मोदी एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. पण आजही मोदींच्या मनात बाळासाहेबांचा मुलगा म्हणून ते उद्धव ठाकरेंचा आदर करतात, असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.
आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन, असेही मोदी यांनी या मुलाखतीत सांगितले.