बिजनेस
मोठी बातमी! देशात तिसऱ्यांदा होणार नोटाबंदी

- गेल्या काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने देशात अचानकपणे नोटाबंदीचा निर्णय घेऊन खळबळ उडवून दिली होती. अचानक झालेल्या नोटाबंदीमुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती. तर अलीकडेच देशातील दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात आता देशात पुन्हा तिसऱ्यांदा नोटाबंदी होण्याची भीती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
देशाचे नाव इंडिया बदलून भारत होणार अशी चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी एका पत्रकार परिषदेत ही भीती व्यक्त केली. मोदी सरकार इंडिया बदलून भारत असे नाव देणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. मोदी सरकार संविधानातील इंडिया शब्द बदलण्यासाठी विधेयक आणणार आहे.
हे विधेयक पारित झाल्यावर नोटांवरही भारत, असे लिहावे लागेल. मग मोदी सरकार नोटाबंदी करणार का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोदी सरकार घाबरल्याचे टीका वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेला मोदी सरकार घाबरल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.