राजकीय
ब्रेकिंग! महाविकास आघाडीचा फॉर्म्युला पुन्हा बदलला
- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्तिच केला होता. त्यानंतर मविआचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने 65 उमेदवारांची घोषणा केली. कॉंग्रेसने 48 उमेदवारांची घोषणा केली. तर काल शरद पवार गटाने 45 उमेदवार जाहीर केले. आतापर्यंत मविआने 158 उमदेवारांची घोषणा केली. दरम्यान, आता मविआचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.
- प्रलंबित जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने काँग्रेस हायकमांडने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे जागावाटपाची सूत्रे दिली. तसेच राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतले. थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या नवी दिल्लीत आहेत. हायकमांडची राज्यातील या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या चर्चेनंतर थोरातांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी जागावाटपाचा नवा फॉर्म्युला स्पष्ट केला.
- थोरात म्हणाले की, राज्याची निवडणूक आहे, त्यामुळे काही अडचणी असतात, त्या आम्ही सोडवत असतो. आम्ही आमच्या मित्रपक्षांना 18 जागा दिल्या आहेत. आता प्रमुख तीन घटक पक्षांचा फॉर्म्युला 85-85-85 वरून 90-90-90 वर पोहोचला आहे.