सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! शेळगीत उद्या स्वरमयी दीपावली कार्यक्रम
- सोलापुरातील सुप्रसिद्ध निवेदक लक्ष्मीकांत वेदपाठक प्रस्तुत स्वरामयी दीपावली अर्थात महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा दाखवणारा विशेष कार्यक्रम, उद्या शनिवार सायंकाळी ठीक साडेसहा वाजता श्री बनशंकरी माता देवी मंदिर समोर सादर होणार आहे. या कार्यक्रमास सोलापूर तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यात आपल्या उत्तम गायकीने प्रसिद्ध असणारे गायक कलावंत, निखिल भालेराव, शशी बासुतकर, सायली साठे तर सोलापूर विद्यापीठात नुकत्याच पार पाडलेल्या युवा महोत्सवातील कव्वाली कलाप्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेला गायक अभिनंदन गायकवाड हे आपली कला सादर करणार आहेत.
- निवेदन लक्ष्मीकांत वेदपाठक यांच्यासोबत आर जे अमृत हे करणार आहेत. सदर कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि लोक संस्कृती सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उद्योजक सुयश खानापुरे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात,योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेळगी चे संस्थापक चंद्रकांतजी रमणशेट्टी, श्री मंडप अँड डेकोरेटर्स चे सचिन हुंडेकरी आणि प्रशांत हिबारे यांच्या हस्ते होणार आहे. तरी शेळगीसह सोलापूर शहर परिसरातील जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री बनशंकरी गणेशोत्सव मंडळ आणि श्री बनशंकरी नवरात्र उत्सव मंडळ शेळगी यांच्यावतीने करण्यात आले आहे.