राजकीय
मशाल विरुद्ध धनुष्यबाण
- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मशाल विरुद्ध धनुष्यबाण यांच्यात फाईट झाली. तेरा जागांवर समोरासमोर लढत झाली. त्यातील सात जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर सहा जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या आहेत. शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना 40 टक्के स्ट्राईकरेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर 47 टक्के स्ट्राईक रेट आमचा होता, असे सांगून आम्हीच लोकसभेच्या निवडणुकीत वरचढ होतो हे स्पष्ट केले.
- शिंदे म्हणाले, या निवडणुकीत दूध का दूध पानी का पानी होईल. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प त्यामध्ये स्टे, स्प्रिड ब्रेकर घातलेले प्रकल्प आम्ही पुढे नेत आहोत. त्यात सुरु केलेले प्रकल्प, एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही महाराष्ट्रात आणल्या. विकास आणि त्यांची सांगड घालण्याचे आम्ही काम केले. जनता जनार्दन आम्ही केलेल्या कामाची पोचपावती या विधानसभा निवडणुकीत आम्हाला देणार आहे हे नक्की. महायुतीचे बहुमताचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा येईल आणि जनतेची सेवा करायला पुन्हा तत्पर राहील.
- शिंदे पुढे म्हणाले, आता सर्वच बाबतीत सांगायचे झाल्यास लवकरच आमची पुन्हा एक यादी येईल. महायुतीत कुठेही वाद नाही, समन्वयाने सर्व गोष्टी होतात. महायुतीच्या बाजूने चांगले वातावरण महाराष्ट्रात निर्माण होत आहे.