ब्रेकिंग! ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवारांना दणका
राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजितदादा पवारांना सुप्रिम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळचे राहणार आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या चिन्हाबाबातच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे निर्देश दिले आहे. कोर्टाचा हा निकाल अजितदादांसाठी दिलासा तर, शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाची चिन्हाबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाचे चिन्ह ‘घड्याळ’च राहणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी घड्याळ चिन्ह गोठवावे. हे चिन्ह अजितदादा यांच्या पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरे चिन्ह देण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावतीने करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पवार गट या याचिकेवर निर्णय होण्याच्या प्रतिक्षेत होता.
अखेर आज यावर निकाल देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजितदादा वेगळे झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजितदादा गटाला दिले. या निर्णयाला पवार गटाकडून याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते.