महाराष्ट्र

ब्रेकिंग! दहावीची परीक्षा झाली आणखी सोपी

  1. महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत बदल केल्याची माहिती समोर आली. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे.
  2. गणित आणि विज्ञान विषय म्हटले की, अनेकांना घाम फुटतो. मात्र, या दोन्ही विषयात कमजोर अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने मोठा बदल केला आहे. बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३५ गुण आवश्यक असतात. मात्र, यापुढे विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञानात २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्याला उत्तीर्ण केले जाणार आहे. पंरतु, संबंधित विद्यार्थ्याच्या निकालावर एक विशेष शेरा देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रमाणपत्र घेऊन अकरावीत प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे, असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
  3. महत्त्वाचे म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर घडवायचे नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम आहे. यामुळे विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही, अशा विद्यार्थ्यांना फायदा होईल. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेत केलेल्या बदलामुळे अनेकांचे करिअर घडण्यात मदत होईल.

Related Articles

Back to top button