महाराष्ट्र

ब्रेकिंग! नागरिक साखर झोपेत असताना जमीन थरथरली

  • राज्यात आज सकाळी दोन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेड आणि हिंगोलीमध्ये आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले आहेत. साखर झोपेत असताना भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील दोन गावांना भूकंपाचे धक्के बसले. तर हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेडमध्ये ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नांदेडमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील तीन महिन्यातील हा तिसरा भूकंपाचा धक्का आहे. आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव आणि मनाठा या गावांच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी नोंद भूकंप मापण केंद्रावर झाली आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या सावरगाव हे या भूकंपाचे केंद्र बिंदू दाखवत आहे. या भूकंपाच्या धक्क्याने या परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही जण साखर झोपेत असताना हे भूकंपाचे धक्के जाणवले.
  • तसेच दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यातदेखील पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोलीच्या कळमनुरीसह औढा तालुक्यातील पंधरा गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले.

Related Articles

Back to top button