देश - विदेश
रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार लोकांना कमी किमतीत रेशन पुरवते. या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका आवश्यक आहे. मात्र आता शिधापत्रिकाधारकांकडे अवघे काही दिवस उरले आहेत. यानंतर शिधापत्रिकाधारकांना दोन गोष्टी मिळणे बंद होईल.
- भारत सरकारने सर्व शिधापत्रिकाधारकांना माहिती जारी केली आहे की, सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करावे लागेल. जे शिधापत्रिकाधारक त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्या शिधापत्रिकाधारकांना दोन गोष्टी मिळणे बंद होईल. नियमानुसार, जर शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण केले नाही तर त्यांना तांदूळ आणि साखर मिळणे बंद होईल.
- भारत सरकारने रेशन कार्डसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत दिली होती. ज्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे. मात्र आता शिधापत्रिकाधारकांकडे यासाठी फारसा वेळ नाही.
- सरकारने यापूर्वी ३१ सप्टेंबर ही शिधापत्रिका ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख निश्चित केली होती. त्यानंतर ही मुदत एक महिन्याने ३१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ आता शिधापत्रिकाधारकांकडे जवळपास ४१ दिवसांचा कालावधी आहे.
- ३१ डिसेंबरपर्यंत शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी न केल्यास त्यांच्या शिधापत्रिकेत मिळणारा तांदूळ आणि साखर बंद होऊ शकते. यासोबतच या शिधापत्रिकाधारकांची नावेही शिधापत्रिकेतून काढता येणार आहेत.