राजकीय

ब्रेकिंग! भाजपचा नवा डाव

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज 99 उमेदवारांची भाजपाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.

पोलिस ठाण्यात जाऊन शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारे भाजप आमदार गणपत गायकवाड हे सध्या जेलमध्ये आहेत. तर भाजपने आज जाहीर केलेल्या यादीमध्ये गणपत गायकवाड यांचे तिकीट कापले आहे. परंतु, दुसरीकडे भाजपने गायकवाड यांचे बंड नको व्हायला म्हणून डाव खेळला.

गणपत गायकवाड यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देऊन संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडली होती. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदारगायकवाड यांनी पोलिस ठाण्यात घुसून शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी महेश गायकवाड यांचे सहकारी राहुल पाटील यांना देखील गोळ्या लागल्या होत्या. या गोळीबाराची चर्चा राज्यभरात झाली. विरोधकांनी तर सत्तेचा माज अशा शब्दात टीका केली. यात महत्त्वाची बाब म्हणजे सुदैवाने महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे वाचले.

या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक झाली. यात पोलिसांना पुरावे दिसून आल्याने अजूनही गणपत गायकवाड हे तेव्हापासून जेलमध्येच आहेत. गायकवाड यांना हे गोळीबार प्रकरण प्रचंड भोवले आहे. त्यांच्या कृतीमुळे गायकवाड यांचे विधानसभेचे तिकीट देखील कापण्यात आले आहे. 

Related Articles

Back to top button