ब्रेकिंग! भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट
राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज 99 उमेदवारांची भाजपाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्याच उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. शरद पवार गटात वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन भाजपाने या नेत्याला धर्मसंकटात टाकले आहे. या नेत्याला तिकीट देण्यात आले असले तरी त्याच्या मुलाचा पत्ता मात्र भाजपाने कट केला आहे.
शरद पवार गटात वाटेवर असलेला हा बडा नेता म्हणाजे गणेश नाईक आहे. नाईक यांना भाजपने ऐरोली मतदारसंघातून तर, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या मॅरेथॉन बैठक होत होत्या. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर लवकरच उमेदवारी याद्या जाहीर होतील, असे सांगण्यात येत होते. त्यानंतर आज भाजपने पहिली यादी जाहीर केली.