महाराष्ट्र

ब्रेकिंग! निवडणुकीच्या गोंधळात ‘लाडकी बहीण योजने’चा पुढचा हफ्ता कधी येणार?

  • राज्यात आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यामुळे आता सरकारी कामांवर याचा काहीसा प्रभाव पडणार आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या काही सरकारी आर्थिक योजना बंद करण्यात याव्यात, अशी सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिली आहे. या सूचनेनुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा योजनांसाठी लागणारा निधी थांबवला गेला आहे. त्यामुळे निवडणुका पार पडेपर्यंत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे पैसे त्यासाठी पात्र असलेल्या महिलांना मिळणार की, नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, यावर आता उत्तर देण्यात आले आहे.
  • दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता ‘लाडकी बहीण योजने’च्या पुढच्या हप्त्याची घोषणा केली आहे. 
  • तटकरे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार! याची अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती!.

Related Articles

Back to top button