ब्रेकिंग!…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या ‘सामना’तील रोखठोकमधून संजय राऊत यांनी आज भाजपावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी फक्त ३५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तर 26 तारखेपर्यंत सरकार बनवावे लागणार आहे. त्यामुळे आघाडीच्या राजकारणात सरकार बनविण्यासाठी फक्त 48 तास मिळतील व त्यात वेळ काढला तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लावतील. हे षड्यंत्र उधळून लावायला पाहिजे, असे सामना अग्रलेखात म्हंटले आहे.
शहा व महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आपण महाराष्ट्र गमावू याविषयी खात्री पटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली तरी त्यांना सरकार स्थापनेस पुरेसा वेळ मिळू नये. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचे असा एकंदरीत डाव दिसतो, असे राऊत म्हणाले