राजकीय

ब्रेकिंग! मनोज जरांगेंनी पत्ते खोलले

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगेंचा इलेक्शन प्लॅन ठरला आहे. जिथे आपले उमेदवार निवडून येणार नाही, तिथे उमेदवार पाडा, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे.

यासंदर्भात आज अंतरवाली सराटी येथे त्यांनी घोषणा केली. त्यामुळे हा महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संपवणार असा इशारा त्यांनी दिला. हा इशारा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांसाठी असल्याचे बोलले जात आहे.

जरांगे म्हणाले, आपला प्रामाणिक लढा आहे. प्रामाणिकपणे मी सांगतो की, आपला लढा फक्त आरक्षणासाठी आहे. हा संघर्ष राजकारणासाठी कधीच नव्हता. पण राजकारण्यांनी मराठ्यांना वेठीस धरले आणि गरिबांना रस्त्यावर आणण्याचे काम सरकार करत आहे. 

Related Articles

Back to top button