राजकीय
ठाकरेंच्या शिवसेनेला ‘नवी मशाल’
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारी याद्या निश्चित होणार आहेत. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सुधारित मशाल चिन्ह दिले आहे. जुन्या मशालमध्ये बदल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यात आली होती. परंतु या चिन्हामध्ये काही त्रुटी होत्या. हे चिन्ह आईस्क्रीमच्या कोनासारखे दिसत होते. त्यावरून ठाकरे गटाकडून टीकाही होत होती. जुन्या चिन्हामध्ये भगवा रंगही होता. आता मात्र स्पष्टपणे दिसणारे ज्वलंत मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळाले आहे.