ब्रेकिंग! ‘लाडक्या बहिणींनो,’ इकडं लक्ष द्या

सध्या राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचारसंहिता लागू असताना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजनांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना या विषयावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
आमची नियत साफ आहे, देण्याची वृत्ती आहे. लाडक्या बहिणीला कायम पैसे मिळतील. ॲडव्हान्स देणारे आमचे सरकार आहे. ॲडव्हान्स घेणारे नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा हप्ता जमा झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. जीआर किती काढले ते वाचा, रद्द केलेले वाचू नका. आम्ही जीआर वेळेवर काढले. त्याचा फायदा मिळू लागला, असे ही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.



