महाराष्ट्र

कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत दोन हजार भाविकांचा मृत्यू

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. या ठिकाणी मौनी अमावस्येनिमित्त करण्यात येणाऱ्या पवित्र स्नानाच्यावेळी संगम घाटावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी होत आलेला असतानाही अनेक भाविक बेपत्ता आहेत. तर महाकुंभतील या घटनेत सापडलेले कुटुंबीय आजही आपल्या लोकांचा शोध घेत आहेत. याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर या घटनेत दोन हजारांपेक्षा अधिक भाविक बेपत्ता असून दीड हजारपेक्षा अधिक भाविक मरण पावल्याची शक्यता असल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे.

राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रयागराज येथील महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, संसदेत मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशातील महाकुंभमेळ्यात जी दुर्घटना घडली. त्याबाबत मत मांडले. महाकुंभ हा आमच्या सर्वांसाठी श्रद्धेचा, आस्थेचा आणि धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करून आले. पुढील आठवड्यात मी सुद्धा या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहे, असे राऊतांकडून सांगण्यात आले. पण शेवटी जी दुर्घटना घडली, त्याला कोणीतरी जबाबदार आहे, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button