देश - विदेश
युद्ध झाले तर आम्ही पाकिस्तानसोबत

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढले आहे. एकमेकांच्याविरोधात घेतलेल्या निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी चिघळत आहे. भारतासह पाकिस्तानच्याही हालाचालींना आता वेग आला आहे.
खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू यांनी पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला धमकी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर ‘इंडियन पंजाब’ पाकिस्तानला पाठिंबा देईल, असे पन्नू यांचे म्हणणे आहे. भारतीय सैन्याला पंजाब ओलांडून हल्ला करू दिला जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
पन्नूने एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर भारत आणि मोदी यांचे हे शेवटचे युद्ध असेल. पंजाब भारतीय ताब्यातून मुक्त होईल. भारतीय पंजाब पाकिस्तानी लष्करासाठी लंगर उभारणार आहे. आम्ही भारतीय सैन्याला रोखू.