पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढले आहे. एकमेकांच्याविरोधात घेतलेल्या निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी चिघळत आहे. भारतासह पाकिस्तानच्याही हालाचालींना आता वेग आला आहे.
पाकिस्तान एलओसी रेषेवर युद्धसराव करीत असून अनेक देशांकडून पाकिस्तानला पाठिंबा मिळालेला आहे. ज्यात चीनचाही समावेश आहे. भारताच्या राफेलला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून एअर टू एअर क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत.
भारताचा सामना करण्यासाठी चीनकडे कोणती क्षेपणास्त्रे- पीएल-८ (PL-8) हे इस्रायलच्या ‘पायथॉन-३’ क्षेपणास्त्रावर आधारित आहे. हे १९८८ पासून चीनच्या वायुदलात कार्यरत आहे. ‘पायथॉन-३’ हे राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम्सने विकसित केला आहे. हे क्षेपणास्त्र ३.५ मॅक वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे. तर, या क्षेपणास्त्राची रेंज २० किमी आहे. मुख्यतः जवळच्या चकमकींसाठी उपयुक्त आहे.
पीएल-१० (PL-10) हे पीएल-८ च्या मर्यादा ओळखून विकसित केले आहे. ‘इमेजिंग इन्फ्रारेड सीकर’, ‘थ्रस्ट-व्हेक्टरिंग’ आणि ‘लेसर प्रॉक्सिमिटी फ्यूज’सह. ९० अंशात वळण्याची क्षमता असून रडार जॅमिंगपासून वाचवण्यास सक्षम आहे.
पीएल-१५ (PL-15) हे अत्याधुनिक सक्रिय रडार-मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र २०१५-१७ च्या सुमारास चीनी हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. हे २०० किमीहून अधिक पल्ला गाठते. हे क्षेपणास्त्र मॅक ४च्या वेगाने उडू शकते.