क्राईम

हिंदू मुलींवर अत्याचार करायचा; पळून जाण्याचा प्रयत्न

  • मध्य प्रदेशातील भोपाळमधून लव्ह जिहादची बातमी समोर आली आहे. यावर स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हिंदू मुलींवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा पोलिसांनी शॉर्ट एन्काऊंटर केला. आरोपीचे नाव फरहान असे आहे. तो हिंदू मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर अत्याचार करायचा. जिहादी व्हायचे त्याचे स्वप्न होते.
  • फरहान हा पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळी चालवली. त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. हमीदिया हॉस्पिटलमध्ये फरहानवर उपचार सुरु आहेत. लव्ह जिहाद प्रकरणात एकूण पाच एफआयआर दाखल झाले आहेत. सर्वच प्रकरणात फरहान हा आरोपी आहे.
  • फरहानने पोलीस उपनिरीक्षकाची पिस्तुल हिकसावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झटापट झाली आणि पोलिसाच्या बंदुकीतून गोळी सुटली. गोळी फरहानच्या पायाला लागली. अशोका गार्डनचे ठाण्याचे प्रभारी हेमंत श्रीवास्तव यांनी सांगितले की, काल ही घटना घडली. रातीबड भागामध्ये फरहान थांबला होता.
  • तो गाडीतून उतरला तेव्हा पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कॉन्स्टेबल त्याच्यासोबत गाडीतून उतरले. याचवेळी फरहानने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. यावेळी झटापट झाली आणि गोळी फरहानच्या डाव्या पायावर लागली.

Related Articles

Back to top button