राजकीय

ठाकरेंना मोठा धक्का बसणार?

  • विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर ठाकरे गटाला अंतर्गत घरघर लागल्याचे चित्र आहे. माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी ठाकरे गट जवळजवळ काँग्रेस झालाय, असे विधान करत उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच आता मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य केले आहे.
  • रत्नागिरी येथे सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सामंत म्हणाले की, मी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते, महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा प्रकारे बदलली आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता वाटते की, आम्हीच बरोबर होतो. ठाकरे गटातील लोकांना आता कोण बरोबर आणि कोण चूक होते, याची जाणीव झाली आहे. परिणामी ते लोक आता आमच्याकडे येत आहेत. रत्नागिरीबद्दल बोलयाचे झाले तर ठाकरे गटाची ज्या पद्धतीने कॉंग्रेस झाली, तीच परिस्थिती ठाकरे गटाची या जिल्ह्यात झालेली दिसणार आहे, असे सामंत म्हणाले.
  • दरम्यान, कोकणातील काही नेते नाराज असले तरी सामंत यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे शिंदे सेनेच्या गळ्याला लागलेला कोकणातील बडा नेता कोण, हेच पाहणे महत्वाचे आहे.

Related Articles

Back to top button