शोएब मलिकचे कारनामे बहिणीकडूनच उघड

Admin
1 Min Read
  • भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक ही जोडी एकेकाळी क्रीडा विश्वात अत्यंत लोकप्रिय होती. परंतु 2022 पासून या दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली. अखेर जेव्हा अचानक शोएबच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आले, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. सानियाने खुला दिल्यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला. खुला ही इस्लामिक कायद्यातील एक प्रक्रिया आहे, जी मुस्लीम महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याची परवानगी देते.
  • आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शोएबच्या बहिणीने धक्कादायक खुलासा केला आहे. सानिया आणि शोएब का विभक्त झाले, यामागचे कारण तिने सांगितले आहे. शोएबच्या तिसऱ्या निकाहला त्याची बहीण उपस्थित नव्हती. एका मुलाखतीत तिने सानिया आणि शोएब हे का वेगळे झाले असावेत, यामागचे कारण सांगितले आहे. घटस्फोटाच्या कारणाबाबत सानिया आणि तिच्या कुटुंबीयांनाही अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती.
  • सानिया त्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे वैतागली होती, असे धक्कादायक वक्तव्य शोएबच्या बहिणीने केले आहे. यामुळेच संपूर्ण कुटुंबाने शोएबच्या तिसऱ्या निकाहला न जाण्याचे ठरवले होते, असाही खुलासा तिने केला आहे.
Share This Article