राजकीय

ब्रेकिंग! संजय राऊतांनी फोडला नवा बॉम्ब

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला माझ्या मुलाचे नाव दिशा सालियन मृत्यू प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता, असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला होता. राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले होते. परंतु, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राणे यांचा दावा साफ नाकारला आहे.

राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे, ज्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राणे यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले. त्यावर राऊत यांनी स्पष्ट शब्दांत इनकार केला.

राणे इतक्या वर्षांनंतर कशाच्या आधारावर असे वक्तव्य करत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांनी आता सत्तरी पार केली आहे. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटते. राणे यांना ज्यावेळी अटक झाली, त्यावेळी त्यांच्याच कुटुंबियांनी ठाकरेंना फोन केला होता. त्यांना सांभाळून घ्या. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांना काही त्रास होत आहे. इतकेच नाही तर थेट केंद्रातूनही फोन आला होता.

राणे यांच्या सुटकेसाठी अमित शहा यांचाही फोन आला होता. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सूचना केल्या आणि राणेंची सुटका झाली, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

Related Articles

Back to top button