क्राईम

गावगुंडांना भरली धडकी

  • बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी बीड पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून घेत प्रतिबंधात्मक कारवाया करून यापुढे गुन्हे केल्यास तडीपार, एमपीडीए, मकोकासाख्या गुन्ह्याची तंबी दिली जात आहे.
  • याअगोदर वाळू माफियांसह गुंडांना बोलावून घेत परेड घेतली होती. शांतता ठेवा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. दरम्यान पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत आणखी एका गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी हरसुल कारागृहात केली आहे.
  • अंबाजोगाई येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या मोहन दौलत मुंडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अलिकडे जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हा प्रस्ताव पारित करून याबाबतचे आदेश दिले आहेत. मुंडे याच्यावर परळीसह इतर विविध ठिकाणी एकूण सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 
  • बऱ्याच दिवसांपासून त्याच्यावर पोलीस प्रशासनाची नजर होती. अखेर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मुंडेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या या कारवाईमुळे गावगुंडांचे धाबे मात्र दणाणले आले आहेत.
  • बीडचे पोलिस अधीक्षक कॉवत ॲक्शन मोडवर आल्याचे पाहावयास मिळत आहे. हत्येचा प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल दीडशे आरोपींना तंबी देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button