राजकीय

ब्रेकिंग! निवडणूक आयुक्तांचे ईव्हीएमबाबत मोठे विधान

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विविध राजकीय पक्षाकडून त्या दृष्टिकोनातून तयारी केली जात आहे. राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी महाविकास आघाडी कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी महायुतीकडून मतदारांची मनधरणी केली जात आहे. यातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. जनता मतदानात सहभागी होऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असते. ईव्हीएमचा प्रश्न असेल तर ईव्हीएम शंभर टक्के फूलप्रूफ आहेत. याआधीही अनेकदा एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, ईव्हीएम बरोबर आहेत. यामध्ये कोणत्याच प्रकारची अडचण नाही. मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत जनतेने ईव्हीएमबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Related Articles

Back to top button