राजकीय

बिग ब्रेकिंग! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विविध राजकीय पक्षाकडून त्या दृष्टिकोनातून तयारी केली जात आहे. राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी महाविकास आघाडी कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी महायुतीकडून मतदारांची मनधरणी केली जात आहे. यातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. केवळ महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. 

Related Articles

Back to top button