राजकीय

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग झाला आहे. सर्वच राजकीय पक्षाला निवडणुकीची तयारी केली जात आहे. राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात झारखंडसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व घडामोडींमध्ये जागा वाटपाच्या चर्चांनी जोर धरला असून लोकसभेत दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवलेला शरद पवार गट विधानसभेत फक्त 75 जागा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. पवारांची ही गुगली सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणपुकांसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 119, ठाकरे गटाला 86, तर शरद पवार गटाला 75 अशा पद्धतीने जागांचे वाटप केले जाणार आहे. तर शेकापला तीन, समाजवादी पक्ष तीन आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत.

आता मविआतील जागा वाटपाचा फॉर्मुला समोर आला आहे, ज्यात पवारांनी फक्त 75 जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. पवारांच्या या खेळामागे काय राजकारण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Back to top button