राजकीय

ब्रेकिंग! महाविकास आघाडीला धक्का

  1. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग झाला आहे. सर्वच राजकीय पक्षाला निवडणुकीची तयारी केली जात आहे. राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही तास आधी होणाऱ्या महायुतीच्या सात उमेदवारांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणारी ठाकरेंची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
  2. राज्यपाल कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या बारा आमदारांपैकी सात उमेदवारांची नावे महायुतीने निश्चित केली. राज्यपालांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर आज तातडीने या आमदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र, ही नियुक्ती बेकायेदशीर असून प्रकरण कोर्टात असताना शपथविधी होऊ नये, असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
  3. राज्यपाल कोट्यातील बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने साडेतीन वर्षांपूर्वीच नावे पाठवली होती. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नावांना मंजुरीच दिली नाही. त्यामुळे ती नियुक्ती रखडली होती. कालांतराने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. ही नियुक्ती केली जाऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेने कोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला होता. मात्र, महायुतीने सात उमेदवार निश्चित करून त्यांना शपथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने पुन्हा न्यायालयात धाव घेतली. मात्र, यावेळी ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. दरम्यान महायुतीच्या सात आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे.

Related Articles

Back to top button