राजकीय

भाजपचा बडा नेता ठाकरेंनी फोडला

  • विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठे उलटफेर होताना दिसत होते. कालपर्यंत एका पक्षात असलेले नेते दुसऱ्या दिवशी भलत्याच पक्षात जाताना दिसत आहेत. सध्या पक्ष बदलण्याचा हंगाम सुरू आहे. त्यात आता तळकोकणात उद्धव ठाकरे यांनी भाजप, राणे यांना जोरदार धक्का देत बडा नेता आपल्याकडे ओढला आहे. त्यामुळे शिंदेंच्या सेनेचे टेन्शन मात्र वाढले आहे. या नेत्याच्या प्रवेशाने तळकोकणातील राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता आहे. हा नेता आज मातोश्रीवर प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे भाजपलाही बळ मिळाले आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदेंच्या सेनेचे दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहे. शिवाय ते मंत्रीही आहेत.

अशावेळी ही जागा महायुतीत शिंदे गटाला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. याच मतदारसंघात भाजप नेते राजन तेली गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत. त्यांनी या मतदारसंघात भाजपची संघटना वाढवली. कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले. दोन निवडणुकीत त्यांनी केसरकर यांना कडवी झुंज दिली. शिवाय केसरकर हे तीन वेळा निवडून आले आहेत.

सध्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात वातावरण आहे. अशावेळी उमेदवारी आपल्यालाच मिळावी, अशी तेली यांची इच्छा होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील.

तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यास शिंदे गटाचे टेन्शन वाढणार आहे. या मतदारसंघात ठाकरेंना मानणारा शिवसैनिक आहे. तो तेली यांच्या मदतीला येणार आहे. त्यामुळे तेली यांचे बळ वाढणार आहे. 

Related Articles

Back to top button