राजकीय

महाविकास आघाडीत जागा वाटपावर घोळ

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. मात्र या जागा वाटपावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा हल्लाबोल केला.

राज्यातील नेते निर्णय घेण्यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळे आज जागा वाटपावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत, असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यातील काँग्रेस नेत्यांवर टीका केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

महाविकास आघाडीचे जागा वाटप गतीने व्हावे. काँग्रेसचा निर्णय राज्यात झाला, तर जागा वाटपाला गती येईल. काही जागांवर गाडी अडली आहे. त्यावर मार्ग निघेल. दोनशे जागांवर आमची सहमती झाली आहे. राज्यातील नेते निर्णय घेण्यासाठी सक्षम नाहीत. तरीही भाजपसोबत कसे लढायचे हे आम्हाला माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button