राजकीय

ब्रेकिंग! महाविकास आघाडीमध्ये वादाचे फटाके

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद आता विकोपाला पोहोचला.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यापुढे जागा वाटपाच्या बैठकीत आल्यास ठाकरे गटनेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. परिणामी मविआत बिघाडी निर्माण झाली. मविआकडून 260 जागांवर बोलणी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी अजूनही 25 ते 30 जागांवर अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

विदर्भातील जागांबाबतही काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गट विदर्भातील वाढीव जागांसाठी आग्रही आहे. मात्र, नाना पटोले यांनी विदर्भातील जागा न सोडण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे कालच्या बैठकीत संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात खटके उडाल्याची चर्चा आहे. जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने ठाकरे गटाने पटोले यांच्या विरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Back to top button