ब्रेकिंग! राज्यात हायव्होल्टेज ड्रामा, महायुतीला दणका
राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
अनेक पक्षात आउटगोईंग तसेच इनकमिंग वाढले आहे. त्यातच आघाड्यांमधील घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण करताना नेत्यांच्या नाकी नऊ आले आहे. निवडणूक जाहीर होताच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्वबळाचा नारा देत महायुतीला पहिला जबर धक्का दिला. जानकर यांच्यानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडली आहे. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचे शिवसंग्राम पक्षाने जाहीर केले आहे. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती विनायक मेटे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
ज्योती मेटे यांनी सांगितले की, महायुती शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. आम्ही राज्यातील पाच जागांवर लढणार असून आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत.
घटक पक्षाला बळ देण्याचे दूरच पण सोबतही घेऊन जाण्याचे काम भाजपकडून होत नाही. त्यामुळे शिवसंग्राम पक्ष आपली वेगळी भूमिका घेईल. विनायक मेटे यांचे निधन झाल्यानंतर शिवसंग्रामला सत्तेत वाटा मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही सुटला नाही. शिवसंग्रामचा राजकीय पटलावरती विचार केला नाही.