क्राईम

ब्रेकिंग! कर्नाटकात प्रेम प्रकरणामधून भयंकर घटना

  • आंतरधर्मीय प्रेम प्रकरणामधून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. या गुन्ह्यांना लव्ह जिहादचा मुद्दा बनवून राजकारणही जोरात सुरू आहे. पुन्हा एकदा असाच प्रकार कर्नाटकमधील हावेरीमध्ये समोर आला आहे.
  • मसूर गावातील 23 वर्षांच्या स्वाती रमेश ब्यादागी हिची तिचा मुस्लिम प्रियकर नयाज आणि त्याच्या दोन मित्रांनी हत्या केली आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वातीचे नयाजसोबत प्रेमसंबंध होते, पण गेल्या काही दिवसांपासून स्वाती नयाजपासून अंतर राखत होती. स्वातीच्या या वागण्यामुळे नयाज संतापला होता. नयाजने त्याचे मित्र विनय आणि दुर्गाचारी यांच्यासोबत स्वातीला गाडीमध्ये बोलावले. हे तिघेही तिला राणेबेन्नूरला घेऊन गेले. तिथे त्यांनी स्वातीला नयाजला भेटण्याची धमकी दिली. 
  • स्वातीने नयाजला भेटायला नकार दिला. यानंतर तिघांनी तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह तुंगभद्रा नदीमध्ये फेकून दिला. स्वाती घरी आली नसल्यामुळे तिची आई शशिकला यांनी स्वाती हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली. दरम्यानच्या काळात पोलिसांना तुंगभद्रा नदीमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह स्वातीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी नयाजला अटक केली असून त्याचे दोन मित्र विनय आणि दुर्गाचारी फरार आहेत.

Related Articles

Back to top button