क्राईम

श्रीमंतीचा किती माज! मद्यधुंद अवस्थेत तिघांना चिरडले

  • एक भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. गुजरातच्या वडोदऱ्यातील करेलीबाग परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत तिघांना चिरडले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडोदरामधील करेलीबाग हा गजबजलेला परिसर आहे. या भागात एका काळ्या रंगाच्या भरधाव कारने तीन दुचाकींना चिरडले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हेमालीबेन पटेल असे या महिलेचे नाव असून जैनी (वय 12), निशाबेन (वय 35), एक दहा वर्षांचा मुलगा आणि आणखी एक 40 वर्षांची व्यक्ती जखमी झाली आहे.
  • हा अपघात इतका भयंकर होता की गाडीमधील एयर बॅग्सही उघडल्या आणि कारचाही चक्काचूर झाला. ही गाडी प्रांशू चौहान याच्या मालकीची असून अपघातावेळी त्याचा मित्र रक्षित चौरासिया गाडी चालवत होता. रक्षित हा मध्यप्रदेशचा असून तो वडोदरा येथील एमएस विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करतो. अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल शंभरच्या स्पीडने गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या तीन बाईक चिरडल्या.
  • संतापजनक बाब म्हणजे, अपघातानंतर चालकाच्या शेजारी बसलेला प्रांशू माझी चूक नाही तो गाडी चालवत होता, असे म्हणत निघून गेला. तर गाडी चालवणारा तरुण रक्षित जेव्हा बाहेर आला, तेव्हा त्याने गाडीला एक फेरी मारली आणि अन अनदर राऊंड, अनदर राऊंड निकिता, असे ओरडू लागला. दरम्यान पोलिसांनी कार चालक रक्षितला अटक केली आहे, तर त्याचा मित्र प्रांशूचा शोध सुरू आहे.

Related Articles

Back to top button