क्राईम

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा शोक व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनीही तपासाची चक्रे जोरात फिरवली. सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी कुर्ला येथील एका घरात गेल्या एक महिन्यापासून भाड्याने राहत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, या प्रकरणात मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक चौकशीसाठी घटनास्थळी दाखल झाले. सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या तीन आरोपींनी कुर्ला येथे एक महिन्यापूर्वी एक घर भाड्याने घेतले होते. या घरात त्यांचे एक महिना वास्तव्य होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. वांद्रे खेरनगर येथे सिद्दिकी यांची हत्या झालेल्या घटनास्थळी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक दाखल झाले असून चौकशी करण्यात येत आहे.
  • सिद्दिकी हे अजितदादा गटाचे नेते होते. ते आमदार झिशान सिद्दिकी यांचे पिता होते. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेरच तीन अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्या. एक गोळी छातीत लागली. तर त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालादेखील एक गोळी लागली. 
  • जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर अज्ञात आहेत. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना पिस्तूल आणि काही कागदपत्रे मिळाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Related Articles

Back to top button