क्राईम

दारू पिऊन मारहाण करणाऱ्या रिलस्टार मुलाचा खून करून पुरले

  • ज्या बापाने लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले, त्याच वडिलांना मुलगा दारू पिऊन मारहाण करत होता. याच मुलाच्या छळाला कंटाळून आधी बापाने रिलस्टार मुलाला संपवले. 
  • नंतर स्वत:ही आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना भरवखेडा ( ता. एरंडोल. जि. जळगाव ) येथे मंगळवारी घडली आहे. बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवर त्यांनी मुलाचा खून करून तो पुरल्याची माहिती दिली.
  • विठ्ठल पाटील ( वय, 50 ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, हितेश विठ्ठल पाटील ( वय, 20 ) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. विठ्ठल पाटील हे माजी सैनिक आहेत. विठ्ठल पाटील भरवखेडा येथील मूळ रहिवाशी असून ते कुटुंबासह एरंडोल येथील वृंदावन नगरात वास्यव्यास होते. 
  • मात्र, तो वडिलांपासून वेगळा राहत होता. तो वडिलांचा छळ करून मारहाण करत होता. या प्रकाराला कंटाळून विठ्ठल यांनी मुलाचा खून करत स्वतः ही आत्महत्या केली. 
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यास कंटाळून भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ त्याचा खून केला व मृतदेह जमिनीत पुरला आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळले. 
  • काल हितेश याचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळून आला. तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी सुती दोरी आढळून आली. या दोरीनेच विठ्ठल यांनी मुलाला फाशी दिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button