महाराष्ट्र

ट्रॅफिक पोलिसांना मनमानी भोवली

  • राज्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच, तीन वाहतूक पोलिसांनी ड्युटीला जाताना दाखवलेली बेपर्वाई आणि वसुलीचा अट्टाहास यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित पोलिसांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी न जाता दुसऱ्या चौकात वाहनचालकांकडून दंड वसूल करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे वाहतूक विभागाने तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे.
  • निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार आणि महिला पोलीस शिपाई मोनिका प्रवीण करंजकर यांचा समावेश आहे. चौकात वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी पुण्यातील पुरम चौकात जाऊन वाहनचालकांना अडवून थेट दंड आकारल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
  • यादव यांची ड्युटी एस पी चौकात, पवार यांची हिराबाग चौकात तर करंजकर यांची भावे चौकात नेमणूक करण्यात आली होती. मात्र, या तिघांनी ठरवलेल्या चौकात उपस्थित न राहता पुरम चौकात वाहने थांबवून फक्त दंड वसुलीवर भर दिला. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्यांवर उपाय न करता केवळ महसूल वाढवण्याच्या उद्देशाने कर्तव्याविरोधी वर्तन केले. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या विश्वासार्हतेवर आणि पुणे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Related Articles

Back to top button