क्राईम

ब्रेकिंग! नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिली

  • कर्नाटकातील चंदपुरा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका 28 वर्षांच्या व्यक्तीने केवळ त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली नाही, तर तो तिचे मुंडकं घेऊन तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. दरम्यान पोलीस स्टेशनमधील हे दृश्य पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. 
  • ही घटना अनेकल तालुक्यातील चंदपुरा जवळच्या हिलालीगे गावात घडली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, आरोपी शंकरने त्याची 26 वर्षांची पत्नी मानसाची कथित अनैतिक संबंधांवरून झालेल्या वादामुळे हत्या केली.
  • पोलिसांनी सांगितले की, दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना एक चार वर्षांची मुलगी देखील आहे. हे दोघेही खासगी कंपनीत काम करत होते. शंकरमध्ये कोरमंगलामध्ये काम करत होता तर मानसी बोमासंद्रा येथे काम करत होती.
  • पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर आणि मानसा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि दोघांनी लग्न केले होते. हे जोडपे काही काळापूर्वीच हिलालीगेमध्ये भाड्याच्या घरात राहायला आले होते. तीन जूनच्या रात्री शंकर कामासाठी घरातून बाहेर पडला आणि मानसाला सांगितले की तो दुसऱ्या दिवशी सकाळी परत येईल. पण, तो काम लवकर संपवून रात्री अचानक लवकर परत आला आणि त्याने कथितपणे मानसाला दुसऱ्या व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले.
  • चौकशी दरम्यान शंकरने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कुणाशी तरी संबंध आहेत, हे त्याला नुकतेच कळले होते. या विषयावरुन त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर ती तिच्या आईच्या घरी निघून गेली. शुक्रवारी रात्री ती घरी परतली तेव्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला, ज्यामुळे शंकरला राग आला.
  • शंकरने रागाच्या भरात मानसाचे डोके धडावेगळे केले आणि नंतर ते कापलेले मुंडके स्कूटरवर ठेवून सूर्यनगर पोलीस ठाण्यात पोहोचला, जिथे त्याने आत्मसमर्पण केले. त्यानंतर सूर्यनगर पोलीस स्टोशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button