ब्रेकिंग! काकांनंतर अजितदादाही ॲक्शन मोडमध्ये
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे अनेक नेते शरद पवार यांच्या पक्षात गेले आहे. तर येत्या काही दिवसात आणखी काही नेते अजितदादा गटातून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अजितदादा देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अजितदादा गटात आज रात्री काँग्रेसचे तीन आमदार प्रवेश करणार आहे. काँग्रेसचे श्यामसुंदर शिंदे , हिरामण खोसकर आणि झिशान सिद्दीकी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
विधानसभा परिषद निवडणुकीमध्ये या तिन्ही आमदारांवर क्रॉस वोटिंग करण्याचा आरोप होता. त्यामुळे काँग्रेस पक्ष या तिन्ही आमदारांवर कारवाई करणार, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. तर आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तिन्ही आमदार अजितदादा यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची समोर आली आहे.