महाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट?
सध्या सोलापूरसह अन्य भागात लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अलीकडे व्हायरल झालेल्या एका दाव्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून आता महिलांना मोबाईल गिफ्ट स्वरूपात मिळणार असे म्हटले आहे.
मात्र महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा सरकारी पातळीवर कुणीही यासंदर्भात अधिकृत घोषणा केली नाही. सरकारी पातळीवर अशी घोषणा झाली असती तर अधिकृत माध्यमांनी त्याबद्दल बातमी प्रसिद्ध केली असती, मात्र तसे आढळले नाही. मोबाईल गिफ्ट द्यायचे असेल तर सरकारने किंवा महिला व बालविकास विभागाने तसे याठिकाणी जाहीर केले असते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क प्रमुख पात्रोडकर यांनी सांगितले की, हा दावा खोटा आहे. अशाप्रकारची कोणतीच घोषणा मुख्यमंत्री किंवा सरकारने केलेली नाही.