क्राईम

प्रियकराच्या मदतीने पत्नीने मध्यरात्री रचला डाव

राज्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने तिच्या अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याची घटना घडली. पुण्यातील वारजे, कात्रज पाठोपाठ पेरणे गावात अशाच प्रकारची ही तिसरी घटना घडली आहे. ही घटना काल लोणीकंद येथील तळेराण वस्ती जवळील खडी मशीन परिसरातील मोकळया जागेत मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल लालसिंग ठाकुर ( वय-३०, रा. वाघमारे वस्ती, पेरणेफाटा, पेरणेगाव ) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी अनिल याचा भाऊ सुनिल लालसिंग ठाकूर (वय-३२, रा. पेरणे फाटा) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुमित्रा लालसिंग ठाकूर (रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा) हिला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिचा प्रियकर प्रफुल पुंडलिक ताथोड (वय-३५) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हा काहीही कामधंदा करत नसे. अनिलला खूप दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी सुमित्रा हिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात सतत भांडणे होत असत. दरम्यान अनिल हा दारु पिऊन तळेराण वस्ती जवळील खडीमशीन परिसरातील मोकळ्या जागेत पडला होता. आपल्या प्रेमात अडथळा ठरलेल्या अनिलच्या डोक्यात दोघांनी मिळून दगड घालून त्याचा खून केला.

Related Articles

Back to top button