ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून पुन्हा संधी
महायुती सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर ही नवीन मुदत दिली आहे.
यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर रात्री 12.00 वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.
राज्य सरकारच्या या योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. आता जी मुदतवाढ दिली आहे. परंतु ऑनलाईन पद्धतीने किंवा अॅपने अर्ज करता येणार नाही. आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज करावा लागणार आहे.