देश - विदेश

माझी सगळी प्रॉपर्टी बॉम्बने उडवा, पण…

प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक दातृत्व आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची ती काळरात्र कशी होती हे रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
देशावर 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला मुंबईवर झाला. समुद्री मार्गे दहशतवादी आले होते. त्यावेळी झालेला हल्लाचा थरारक आठवणी आहेत. त्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. दहशतवाद्यांनी प्रसिद्ध ताज हॉटेलला लक्ष्य केले होते. या हल्ल्याची ती काळरात्र कशी होती हे रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
रतन टाटा सांगतात, त्या रात्री माझ्या एका सहकाऱ्याचा फोन खणखणला. ‘ताज’ मध्ये प्रचंड गोळीबार सुरू झाला आहे, असे मला त्या सहकाऱ्याने सांगितले. मी लगेच ‘ताज’ हॉटेलच्या स्विच बोर्डला फोन केला. पण कोणीही माझा फोन उचलला नाही…मी तातडीने ‘ताज’ हॉटेलच्या लॉबीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण तेही शक्य झाले नाही. हॉटेलमध्ये पोलीस पोहोचले होते. पोलिसांनी सगळ्यांना बाहेर काढले. मी काही वेळ तिथे बाहेर थांबलो… काही वेळाने घरी आलो. आमच्या हॉटेलमध्ये काय चालले आहे हे मी टीव्हीवरच पाहू शकत होतो. हा दहशतवादी हल्ला आहे हे पहिल्या काही तासांतच स्पष्ट झाले होते.
या दरम्यान रतन टाटा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांना म्हणाले की, गरज पडली, तर माझी पूर्ण प्रॉपर्टी बॉम्बने उडवा. मला त्याची फिकीर नाही. पण एकही दहशतवादी जिवंत सुटता कामा नये.
रतन टाटांनी या दहशतवादी हल्ल्यातून ‘ताज’ हॉटेल पुन्हा उभे केले आणि मुंबई आणि ताज त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे, हा विश्वास जगभरातल्या पर्यटकांना दिला. ‘ताज’वरच्या हल्ल्यानंतर तिथे जाऊन परिस्थितीची पाहणी करणारे रतन टाटा आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत.

Related Articles

Back to top button