महाराष्ट्र

लाडक्या बहिणींविषयी केलेले वक्तव्य भोवणार?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर राऊत यांच्यावर मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाली आहे, तर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. याच विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौधरी यांच्या तक्रारीवरुन राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशात सरकारतर्फे लाभार्थी महिलांना दर महिना1250 रुपयांचा निधी देण्यात येतो. भाजपा सरकार भगिनींच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी भाजपा सरकार महिलांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे. मध्यप्रदेशात गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरूच आहे.

Related Articles

Back to top button