ट्रकच्या मागे लिहिलेल्या ‘ओके टाटा’ शब्दांचा अन् रतन टाटांचा संबंध काय?
प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेकांनी रस्त्यांवरून चालणाऱ्या ट्रकच्या मागे कविता किंवा अन्य मजकूर लिहिलेला वाचला अथवा पाहिला असेल. त्यात बहुतांश ट्रकच्या मागे नंबरपेक्षा मोठ्या अक्षरात ओके टाटा असे लिहिलेले असते. मात्र, बहुतेक लोकांना त्याचा अर्थ माहित नाही.
बाईक आणि चारचाकी वाहनांवर ओके टाटा लिहिलेले दिसत नाही, तर ट्रकवर असे का लिहिले जाते? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याचे उत्तर टाटा समूहाकडून मिळते. आता ओके टाटा हे शब्द कोणत्या ट्रकवर लिहिलेले असतात तर, याचे उत्तर थेट आहे आणि ते म्हणजे टाटा ग्रुपने उत्पादित केलेले ट्रक होय.
टाटा कंपनीकडून निर्मिती केलेल्या ट्रकवर OK TATA असे लिहिलेले असते हे एक कारण झाले. तर, दुसरे कारण म्हणजे ज्या ट्रकवर ओके टाटा लिहिले असते, त्याचा अर्थ त्या वाहनाची चाचणी झाली असून, ते वाहन अधिक चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय हे या वाहनाची निर्मिती टाटा मोटर्सच्या मानकांनुसार आणि दुरुस्ती केली गेल्याचे दर्शवतो. तसेच या वाहनांची वॉरंटी फक्त टाटांकडेच आहे, ही ओळही याची पुष्टी करते.
ओके टाटा… जरी कंपनीने आपल्या पॉलिसीसाठी हे दोन शब्द बनवले आणि ट्रक्सवर लिहिले, पण हळूहळू ते एक ब्रँडिंग शस्त्र बनले. हे ट्रक्सच्या माध्यमातून संपूर्ण देशात लोकप्रिय झाले. आजही जर तुम्ही एखाद्याला ओके टाटा म्हणाल तर त्याला समजेल की हा शब्द कुठे जास्त लिहिला जातो.