देश - विदेश

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण?

  • उद्योगपती व समाजसेवक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झाले. टाटा समुहाचा विस्तार रतन टाटा यांनी केला. मोठे उद्योगपती यासोबतच ते समाजसेवक देखील होते. त्यांनी टाटा समुहाचे साम्राज्य विस्तारले. त्यांनी तब्बल ३,८०० कोटींची संपत्ती निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याबाबत आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
    रतन टाटा यांच्या निधनानंतर आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, टाटा समूहाचा पुढचा प्रमुख कोण असेल? रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांना मुलंबाळं नसल्याने एवढ्या मोठ्या उद्योगाची धुरा कोण सांभाळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण होणार याबाबत यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून विविध नावांची चर्चा राहिली आहे.
    रतन टाटांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत नोएल टाटांचे नाव आघाडीवर आहे. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्न केली होती. त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांचे पुत्र नोएल हे भविष्यात टाटा समुहाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. नोएल हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत. नवल यांची दुसरी पत्नी सिमोन यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मात्र, त्याचे वाढते वय लक्षात घेता त्याच्या तीन मुलांपैकी कोणत्याही एकाला या उद्योगाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
    नोएल टाटा यांना तीन मुले आहेत, ज्यांना टाटा उद्योग समूहाचे संभाव्य वारसदार म्हणून पाहिले जाते. सर्वात मोठी लिआ टाटा यांनी स्पेनमधील माद्रिद येथील आयई बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. २००६ मध्ये त्या टाटा समूहात ताज हॉटेल रिसॉर्ट्स अँड पॅलेसमध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून रुजू झाल्या आणि आता इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) मध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
    धाकटी मुलगी माया टाटा यांनी टाटा कॅपिटलमध्ये समूहाच्या प्रमुख वित्तीय सेवा कंपनीत विश्लेषक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तर त्यांचे बंधू नेव्हिल टाटा यांनी ट्रेंटमध्ये आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला. कंपनीची रिटेल चेन तयार करण्यात त्यांच्या वडिलांनी मदत केली. नेव्हिल यांनी टोयोटा किर्लोस्कर समुहाच्या मानसी किर्लोस्कर यांच्याशी विवाह केला आहे. नेव्हिल हे स्टार बाझारचे प्रमुख आहेत. ही कंपनी हायपरमार्केट चेन ट्रेंट लिमिटेड अंतर्गत येते.

Related Articles

Back to top button