देश - विदेश

धन्यवाद, तुम्ही माझा विचार केलात

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र सरकारने आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, रतन टाटा यांनी सोशल मीडियावर केलेली अखेरची पोस्ट आता चर्चेत आली आहे. धन्यवाद, तुम्ही माझा विचार केलात, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.
रतन टाटा यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र दोन दिवस आधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. धन्यवाद, तुम्ही माझा विचार करता असे शब्द त्यांच्या भावनिक पोस्टमध्ये होते. रतन टाटांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांत बातम्या सुरू झाल्या होत्या. रतन टाटा यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला जात होता. आयसीयूत दाखल केल्याचे सांगण्यात येत होते. या बातम्यांचे खंडन करण्याच्या उद्देशाने रतन टाटांनी ही पोस्ट टाकली होती.
सोशल मिडिया एक्सवर त्यांनी एक पोस्ट लिहीली होती. यात त्यांनी म्हटले होते की, माझ्या आरोग्याबाबत पसरलेल्या अफवांची जाणीव मला आहे. सर्व दावे निराधार आहेत. मी सर्वांना खात्री करून देऊ इच्छितो की मी वैद्यकिय तपासणी करत आहे. वय आणि परिस्थितीमुळे मी ही तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाही. माझे आरोग्य चांगले आहे. मी जनतेला आणि माध्यमांना विनंती करू इच्छितो की कृपया चुकीची माहिती पसरवू नका.

Related Articles

Back to top button