देश - विदेश

ते म्हणतायत तुम्ही गेलात…

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्यावर सगळ्यांनीच भरभरून प्रेम केले. आता सर्वजण रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत. 

दरम्यान, रतन टाटा यांची मैत्रीण-बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सिमी यांनी आपला आणि रतन टाटा यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘अलविदा माझ्या मित्रा’.
रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर एक काळ असा होता जेव्हा ते बॉलिवूड अभिनेत्री सिमीला डेट करत होले. सिमीने एका जुन्या मुलाखतीत रतन टाटांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. आता रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची आठवण काढत सिमीने रतन टाटांसोबतचा आपला एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘ते म्हणतायत तुम्ही गेलात… तुमच्या जाण्याचे दु:ख सहन करणे कठीण आहे… खूप अवघड… अलविदा, मित्रा.’
२०११ मध्ये एका मुलाखतीत सिमीने रतन टाटा यांचे एका शब्दात वर्णन करताना त्यांना ‘परफेक्शन’ म्हटले होते. याचवेळी सिमी यांनी आपण कधीकाळी रतन टाटांसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, याची कबुली दिली होती. 

Related Articles

Back to top button