उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देश हळहळला

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला दुख: झाले आहे. सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते, अभिनेते प्रत्येकजण या महान उद्योगपतीला श्रद्धांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रतन टाटा ८६ वर्षाचे होते व ७ ऑक्टोबरला ते नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले होते.