सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! दंगा करत महिलांची छेडछाड
सोलापूर (प्रतिनिधी) २०२३ व २०२४ सर्वसामान्य नागरिकांना दमदाटी, शिवीगाळ करून मारहाण करणे, बेकायदेशी मंडळी जमा करून दंगा करत महिलांची छेडछाड करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने केतन उर्फ बाबा नारायण देवी (वय-३२, रा.सिद्धेश्वर हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँड जवळ, जुना पुना नाका) याला सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे.
तसेच सिद्राम बसप्पा वाघमारे (वय-३५,रा.कोनापुरे चाळ, रेल्वे लाईन, सध्या दुर्गा माता मंदिर जवळ जगजीवनराम झोपडपट्टी मोदी) यांच्याविरुद्ध २०२३ या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांची फसवणूक करणे, मोटारसायकल चोरी करणे, यासारखे गुन्हे दाखल असून याला देखील सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे.
केतन उर्फ बाबा देवी याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत व सिद्राम वाघमारे याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये चा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे यांनी कार्यवाही करून दोघांनाही दोन वर्षांकरिता सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर त्यांना पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.